
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कळका:- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खंडेरायाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे सामने आयोजीत केले होते.प्रथम बक्षीस ७००१ रु.,दुसरे ५००१ रु.,तिसरे बक्षीस ३१०० रु. होते. तसेच शंभर रूपया पासून एक हजार रुपया पर्यंत अनेक कुस्त्या झाल्या. एका अपंग पहिलवानाने ७००रु. ची कुस्ती जिंकली आहे. त्यांने अपंगगत्वावर मात करून कुस्ती जिंकली आहे. या कुस्तीच्या सामन्यासाठी परीसरातील नागरीक, पाहुणे, पहेलवान,सरपंच, उपसरपंच,विलास पोलीस पाटील , व्यंकटराव चेअरमन,युवानेते राजीव पाटील,विजय पाटील, संभाजी तिरुपती पाटील, बालाजी पहेलवान, हनमंतराव लीडर, ईश्वर पाटील ,उत्तमराव पाटील, केशव पाटील, तानाजी पाटील, जेजेराव पा., गोविंदराव माजी सरपंच,गोपीनाथ पा.,मनोहर पा. , वसंत गादेकर आणी समस्त गावकरी मंडळी उपस्थीत होते असे गीरमाजी गायकवाड सहाय्यक प्रतिनिधी दैनिक चालू वार्ता यांनी कळविले आहे.