
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बालाजी देशमुख
केज-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते निवडणूक प्रचाराचा नारळ शुभारंभ करण्यात आला यावेळी आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
आज केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शहरातील मतदारांना केज शहराचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेला संधी देण्याचे आवाहन केले. या प्रचार सभेसाठी शिवसेना नेते
बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, नितीन धांडे, संजय महाद्वार, तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे, दिनकर कदम, किसन कदम या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच शहरातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.