
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई कोरोनाचा प्रादुर्भाव आणि परजिल्ह्यात आढळणारे ओमायक्रॉनचे रुग्ण लक्षात घेता अंबाजोगाई तालुका प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून, शहरात मास्क न वापरण्यांविरुद्ध धडक कारवाई करत दंड वसूल करण्यात येत आहे. शहरात गुरुवारी प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला नसून नवा ओमायक्रॉन नावाचा व्हेरिएंट भारतात आढळून कोरोनाच्या या ओमायक्रॉनचे रुग्ण जिल्ह्याच्या जवळच असलेल्या लातूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. अंबाजोगाईपासून लातूर दूर नसल्याने शहरात या नव्या व्हेरिएंटचा फैलाव होऊ शकतो,
त्यामुळे तालुका प्रशासन सतर्क झाले असून आजपासून तोंडावरमास्क नसलेल्यांच्या विरुद्ध धड़क कारवाई करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज डिसेंबरला मास्क न वापरण्याविरुद कारवाई करण्यात आली. अनेकांकडून
२०००, ५००, २०० असा दंड वसूल करण्यात आला. .ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगत मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनाकडून मास्क नवापरणाऱ्या विरोधातील कारवाईत अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, तहसीलदार विपीन पाटील यांच्यासह महसूल, पोलिस, आरोग्य, नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.