
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
भानुदास पवार
जळगाव दि.१८ – लहुजी ब्रिगेड च्या महिला प्रदेश अध्यक्षा आशाताई अंभोरे, अल्पसंख्याक महीला आघाडी प्रदेश अध्यक्षा यास्मीन शेख, आदिवासी महिला आघाडी अध्यक्षा मालनताई तडवी, प्रदेश उपाध्यक्षा फिरोजाबी पठान, शारदाताई तायडे जिल्हा सरचिटणीस महीला आघाडी यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
सौ.सिताबाई देवरे ह्या नासिक येथील रहिवासी असून त्यांचे नासिक जिल्ह्यासह राज्यभरात उपेक्षित, दलित,मातंग समाजासाठी मोलाचे कार्य असून त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाऊ अंभोरे यांच्या आदेशान्वये ही निवड करण्यात आली आहे.तसेच लहुजी ब्रिगेड अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश अध्यक्ष शेरखान हेदेखील उपस्थित होते. असे लहुजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भानुदास पवार यांनी कळविले आहे.