
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
कंधार: तालुक्यातील बामणी ( प.क )येथील दत्तमंदिरात प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दत्त जन्म निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
अनवाणी हातात निशान आणू मुखाने दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो देवा दत्ता दत्ता देवा दत्ता असा गजर दत्त मंदिरात दत्त भक्ताच्या आवाजाने व भक्तिमय वातावरणाने मंदिर परिसर फुलून गेला होता.
सकाळपासून मंदिरात देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता असा नामगजर दत्त भजनी मंडळ व भक्तांच्या आवाजाने बामणी गाव भक्तिमय झाले होते दत्त जन्म झाल्यानंतर मंदिरामध्ये दत्तात्रयाची महाआरती गणेश महाराज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंदिरात उपस्थित विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष साहेबराव कदम कृष्णा पाटील जगताप यांच्यासह गावातील महिला मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्याचप्रमाणे बामणी गावातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी आणि गावातील गावकरी तरुण मंडळी व परिसरातील दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.