
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
( सुनील पाटील )
म्हसावद प्रतिनिधी -नंदुरबार जिल्ह्यात सध्या हूडहुडी वाढली असून शहरी भागात तापमान १३ अंश सेल्सीअस पर्यंत पोहोचले आहे. तर राज्यातील दोन नंबरचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळ, डाब, मोलगी, परिसरात तापमान ११ अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून वायव्य आणि लगतच्या मध्ये भारत आणि गुजरातच्या बहुतेक भागात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने नंदुरबार जिल्ह्याच्या पारा उतरून थंडी वाढण्याची शक्यता वर्तवली होती.
जिल्ह्यात पुढील काही दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्र हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी व्यक्त केली असून नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी गरम कपडे परिधान करावे तसेच केळी पपई फळबागा प्लास्टिक ने गुंडाळावे गाय बैल बकरी आदी जनावरांना उघड्यावर न बांधता बंद घरात गोठ्यात बांधावे कुकटपालन शेतकऱ्यांनी शेडला पडदे लावून १०० डिग्री तापमान लाईटचा वापर करावा असे आव्हान कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारच्या तोरणमाळ , दाब, मोलगी, परिसरात तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे त्यामुळे थंडीने जनजीवन विस्कळीत होत आहे जिल्ह्याच्या अनेक गावांमध्ये थंडीमुळे रस्त्यावर सकाळी उशिरापर्यंत सामसूम दिसत आहे