
दै ,चाललु वार्ता,खंडाळी प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी:- नांदेड,जिल्यातील दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (Omicron variant of Coronavirus) पार्श्वभूमीवर तसेच नांदेड जिल्ह्यात कमी लसीकरण झाल्याने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रा रद्द करण्यात आली असली तरी खंडोबाची मुख्य पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम खंडोबा पूजा पार पडणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे श्री क्षेत्र खंडोबाचे मंदिर आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस इथे मोठी यात्रा भरते. विविध राज्यातून या यात्रेत व्यापारी सहभागी होतात. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक सामील होत असतात. पण कोरोनामुळे सलग 2 वर्ष ही यात्रा रद्द करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. मात्र लसीकरनात नांदेड जिल्हा अजून मागे आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डोस 72% तर दुसरा डोस फक्त 32% लोकांनी घेतला आहे. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा पतिषदेच्या सर्व साधारण सभेत माळेगाव यात्रे संदर्भात जोरदार चर्चा झाली होती. यंदा कोविड नियमांचे पालन करत यात्रा भरवावीअसा काही सदस्याचा आग्रह होता. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. पण ओमायक्रोनचा एक रुग्ण बाजूच्या लातूर जिल्ह्यात आढळला. माळेगाव हे गाव लातूर जिल्ह्याच्या सीमेवरच आहे.
देशभरात झपाट्यानं प्रसार; महाराष्ट्र ओमायक्रॉनचा Hotspot, रुग्णांचा आकडा 88 वर
या यात्रेला लातूरहुन देखील मोठ्या संख्येने भाविक आणि व्यापारी येत असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता म्हणून यंदा देखील माळेगाव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगावच्या यात्रेला राजश्रय देखील आहे. माळेगावचा खंडोबाराया काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुल दैवत आहेत. हयात असतांना विलासराव देशमुख दरवर्षी यात्रेला येत असतं. आता ही दरवर्षी विलासराव यांचे सुपुत्र धीरज देशमुख यात्रेला येतात.गेल्या 2 वर्षीपासून यात्रा रद्द होत आहे या वर्षी पण नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील सर्वात मोठी दक्षिण भारतातील ओळखली जाणारी खंडोबा यात्रा यावर्षी पण रद्द करण्यात आली .