
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार: युवा प्रतिष्ठान सारंगखेडा चे अध्यक्ष , भोईसमाज तालुका युवाध्यक्ष , शहादा कवी लेखक व मुक्तपत्रकार श्री दिपक सुमन पंडित साटोटे यांना नाशिक येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी रजि ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद २०२१ अंतर्गत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, गेल्या सहा वर्षांपासून दिपक साटोटे समाजकार्यात अग्रेसर आहेत, महाराष्ट्र शासन सोशल मीडिया जनजागृती महामित्र, स्वच्छताअभियान,दरवर्षी वृक्षारोपण , त्यांची वाढदिवसानिमित्त रक्तदान अन्नदान करण्याची प्रथा कमालीची व कौतुकास्पद, गेल्या कोरोना काळात निर्भिडपणे आरोग्यसेवा , समाजसेवेचा मूळ पाया. शिकत असताना शा वि नि धुळे येथून समाजकार्याची शिदोरी मिळाली, करिअर विषयक तरुणांना मार्गदर्शन,समाजप्रबोधनपर लेख लिहणे ,सामाजिक भान ठेवून माणुसकी टिकविण्याचा दृढ निश्चयाने , नेतृत्व ,वक्तृत्व दातृत्व आणि कर्तृत्व यांना शस्त्र बनवून तरूणांसाठी जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केलाय, श्री कृष्णाजी जगदाळे अध्यक्ष एमवीएलए ट्रस्ट यांनी सर्व कार्याची सखोल दखल घेऊन , मराठी साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या हस्ते पुरस्कार देउन गौरविण्यात आले, कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी सोनाने महाराज आळंदीकर, प्रकाश सावंत मनीषा मॅडम, मीनाक्षी मॅडम , युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कपिल भोई उपस्थित होते, साटोटे यांचे जिल्ह्यात कौतुक व अभिनंदन होत आहे .