
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
शहादा- संपूर्ण भारताचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबनेची घटना कर्नाटक राज्याच्या बंगळुरू येथे घडली त्याच्या निषेधार्थ शहादा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. बेताल वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि विटंबना करणाऱ्या समाज कंटकावर कार्यवाही करावी अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली यावेळी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे, महिला सेनेचे वैशाली ताई मोरे
दिपाली ताई पाटील, कौस्तुभ मोरे, सुहास पाटील, निलेश पाटील, गोपाल कोळी, दीपक लोहार, रोहित खैरनार, रविकांत सांजराय, विक्की पाटील,यश पाटील, जयेश कुंभार,
रोहन दावळे, कल्पेश डांगळे, यातिष पाटील, गौरव शिंपी आदी उपस्थित होते.