
दैनिक चाललु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची जिल्हा बँकेवर कागल तालुका सेवा संस्था गटातून बिनविरोध निवड झालेली आहे त्यांच्या विरोधात बाबासो पाटील,प्रताप पाटील,धनंजय पाटील,दत्तात्रय खराडे आणि युवराज पाटील या सर्व उमेदवारांनी माघार घेतली.त्यामुळे त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवड बिनविरोध झालेली आहे . आता फक्त औपचारिक रित्या बाकी राहिले आहे यापूर्वी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध झाले आहेत आत्तापर्यंत दोन जागा बिनविरोध झाल्या असून उद्या दि 21 दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आहे उद्या शेवट दिवसाकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.मुष्रिफ साहेबांचा सुरुवातीपासूनच सर्व जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता परंतु आता सर्वच जागा काय बिनविरोध होणार नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे