
दै.चालु वार्ता प्रतिनिधि लोहा
मारोती कदम
लोहा येथील जेष्ठ नागरिक व माळाकोळी येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी बाबुभाई शेख यांचे नुकतेच दि. १० डिसेंबर रोजी दिर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले,एक मुलगी सुन जावाई नातू असा परिवार आहे. ते पत्रकार युनुस शेख यांचे वडील होते.
दिवंगत बाबुभाई शेख हे अत्यंत शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून शेख कुटूबीयांना ईश्वराने बाहेर काढावे यासाठी त्यांचे कुटुंबीयांचे सर्व स्तरातून सांत्वन होत आहे.
यात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले व कुटुंबाला धिर देत त्याना या दुखातुन बाहेर येण्यासाठी आधार दिला युनूस शेख यांना गळाभेट घेत मी तुमच्या पाठीशी आहे असे सांत्वन केले त्यावेळी उपनगराध्यक्ष शरद पवार, केशवराव मुकदम, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, लोहा न.पा.चे गटनेते करीमभाई शेख, माजी जिप सदस्य गणेशराव पाटील सावळे, युवा नेते सचीन मुकादम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव घोंरबाड आनंदराव, बाळू पवार, अनिल धुतमल, विजय केंद्रे,यांच्या सहीत सर्व पत्रकार मित्र, आदीने शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.