
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
( सुनिल पाटिल )
म्हसावद प्रतिनिधी –
शहादा तालुक्यातील साबलापाणी येथे पशुधन विकास पशुवैद्यकीय दवाखाना अंबापूर व बायफ संस्था यांच्या संयुक्त विध्यमाने ए . एस .के . फाउंडेशन समृद्ध किसान कार्यक्रमांतर्गत साबलापाणी येथे पशुधन सर्व चिकित्सा मोहीम व लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये ४०० – लाळ्या खुरकत जनावरे , गायी व म्हशी तसेच
३६०- शेळ्यांना जंत निर्मूलनाचे औषध देण्यात आले , २५ – गाईंचे गर्भातपासणी , २० – गायी म्हशींचे वंध्यत्व तपासणी २०- जनावरांचे खच्चीकरण , ४- कृत्रिम रेतन असे एकूण ८२९ जनावरांना उपचार करण्यात आला. यासाठी डॉ. वासुदेव पावत ( पशुधन विकास अधिकारी ) ,
डॉ . व्ही. बी. सामुद्रे (पशुधन पर्यवेक्षक ) ,
डॉ.हिम्मत पावरा(पशुधन पर्यवेक्षक पाडळदा) , बायफ संस्थेचे विभागीय प्रमुख लिलेश नाटेश्वर चौव्हाण उपस्थित होते . डॉ. पावरा यांनी अंबापूर व साबलापाणी येथील पशुपालकांना साथीच्या आजाराबद्दल सांगून काळजी काय घ्यावी याबाबत सांगून काय काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश पाटील , संजय पावरा , देवेंद्र पाटील , रोहित मालचे ,अनिल पावरा , गोविंद पावरा , रोहित निकम , तेरसिंग पावरा , रामचंद्र भंडारी , फेंदा पावरा, व ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले .