
दैनिक चालू वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन औरंगाबादेत गौरव.…
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना औरंगाबाद यांच्यावतीने पोलीस पाटील दिनानिमित्त पत्रकार गुलाब वाघ,फिरोज मंसूरी,बाबासाहेब वाघ,गणेश डगळे या पत्रकारांना आदर्श पत्रकार व कोरोना योद्धा प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले यावेळी औरंगाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर जे.जे.हॉस्पिटलचे संचालक डॉ.जीवन राजपूत हे क कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आद्यक्षीय भाषणात बोलताना पोलीस अधीक्षक निमीत गोयल म्हणाले की कोरोना काळात काम करताना पोलिसांना आजच्या कोरोना योद्धा पुरस्कार मिळालेल्या सर्व पत्रकारांचे कोरोना काळातील काम वाखाणण्याजोगे असल्याने त्यांचा सत्कार पोलीस पाटील संघटनेकडून होणे म्हणजे दुग्धशर्करा योग असल्याचेही गोयल यांनी संगितले.
पोलीस पाटील संघटनेचे प्रदेशअध्यक्ष महादेव नागरगोजे,राज्य समन्वयक कारभारी निघोटे,मराठवाडा उपाध्यक्ष भगवान डोळस,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कऱ्हाळे, प्रसिद्धी प्रमुख निरंजन गायकवाड आदींसह राज्यभरातील पोलीस पाटलांची उपस्थिती होती.