
दै.चालु वार्ता
प्रतिनिधि लोहा मारोती कदम
नांदेड. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगाव या ठिकाणी भरते परराज्यातून सुद्धा उंटाचे व्यापारी, घोड्यांचे व्यापारी, कपड्यांचे व्यापारी, माळेगाव ला येत असतात माळेगाव खंडोबाचे जागृत देवस्थान आहे माळेगावची यात्रा झालीच पाहिजे असा सवाल जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांनी मांडला स्थायी समितीची बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत माळेगाव यात्रेवरून जोरदार चर्चा झाली जिल्हा परिषद प्रशासन, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याचे प्रवीण पाटील चिखलीकर म्हणाले कोरोणा महामारी विरुद्धच्या नियमांचे पालन करीत पालखी महोत्सव देवस्वारी होणार आहे या यात्रेसाठी जिल्हा परिषदेचा जमा असलेला निधी खर्च करावा अशी मागणीही प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केलेली आहे कोविड _19 लसीकरणानंतर समाजामध्ये जनजागृती आलेली आहे आणि सर्वांनी कोवीडचे लसीकरण केलेली आहे त्यामुळे यात्रेला काही समस्या येणार नाही कारण जिल्ह्यामध्ये सगळीकडे प्रचार सभा ,मोर्चे आंदोलने चालूच आहेत त्याना कोरोणा नाही का, खंडोबा हे सर्वांचे आराध्य दैवत असल्यामुळे या यात्रेला प्रशासनाने व स्थानिक सत्ताधारी यांनी अडचण आणू नये अशी मागणी स्थायी समितीच्या सभेमध्ये प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केलेली आहे यात्रा भरावी अशी सर्व भाविकांची इच्छा आहे आणि काही गोर गरीब लोकांची वार्षिक कमाई या यात्रेमधून होत असते आणि त्यांचा गुजारा चालत असतो, यामुळे गोरगरीब लोकांच्या व्यवसायाकडे लक्ष देऊन भक्तांच्या भक्ती कडे लक्ष देऊन जिल्हा परिषद प्रशासन व जि.प.सत्ताधारी मंडळी यांनी यात्रा चालू करावी असे त्यांनी या सभेमध्ये विचार मांडले कोरोणा चे सर्व नियम पाळून पालखी महोत्सव ,देवस्वारी सर्व कार्यक्रम होतील या मागणीसाठी देखील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विपीन विटणकर साहेबांची भेट घेतली आहे .आणि यात्राही भरावी यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी प्रविण पाटील चिखलीकर यांनी या बैठकीत केलेली आहे