
दै. चालु वार्ता
नांदेड / गोविंद पवार
कोव्हीड लसीकरचा वेग १००% पुर्णत्वाकडे
पेनुर : – पेनुर येथील अरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत कानगुले , आरोग्य सेवक , सेविका मदतनीस , व शिक्षण विभागाचे गटविकास अधिकारी सोनटक्के शिक्षण विस्तार अधिकारी श्री आंबलवाड मॅडम , शिक्षण विस्तार अधिकारी पठाण , केंद्रप्रमुख जाधव सर यांच्या विषेश मार्गदर्शनखाली , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदिप साखरे , संजय राठोड , दत्ता पुणेबोईनवाड , आशा सेविका आशा फुलारी , उज्वला एडके , यांच्या विषेश सहकार्य हे कोव्हीड लसीकरण १००% पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
आरोग्य विभाग व शैक्षणिक विभाग यांनी गावातील नागरिकांना कोव्हीड लसीकरण याविषयी जनजागृती करत लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लसीकरण घेण्यास उत्सुक केले व या लसीकरणाला पेनुर गावातील नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने हे लसीकरण १००% पुर्णत्वाताकडे झेप घेत असल्याने गावातील नागरिक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य , पोलिस पाटील यांनी आरोग्य विभाग व शैक्षणिक विभागाचे कौतुक केले आहे.
पेनुर ( मोठे ) गाव लोकसंख्येच्या तुलनेत मोठे आहे गांवकरी मंडळीनी लसीकरणाला प्रतिसाद दिल्याने तालुक्यात १००% लसीकरण पुर्णत्वाकडे जाणारे एकमेव गाव पेनुर हे ठरले आहे