
*दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी *मिलिंद खरात.
*शासनाच्या आदेशानुसार शहरी भागातील शाळा नियमीत सुरु झाल्या, दिड वर्षाच्या कालावधी नंतर शाळा नियमीत सुरु होऊन विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षण घेणार आहेत हि अतिशय आनंदाची बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यानी आनंदाने शाळेत यावे व प्रसन्न मनाने अध्ययन करावे या उद्देशाने क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालय कल्याण डोंबिवली म.न.पा. शाळा क्र. 30 टिटवाळा येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागताने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, चॉकलेट, मास्क देऊन आनंदाने स्वागत करण्यात आले.या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री प्रविण कांबळे, राजाराम साबळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमी वर शाळा व सुरक्षीतता बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला मते मॅडम, सहशिक्षक सिताराम मुठे सर, राजाराम साबळे सर, प्रविण कांबळे सर व बालवाडी शिक्षिका कांबळे मॅडम व पालक उपस्थित होते*