
दै. चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी दिगंबर वानखेडे
शेतकऱ्यांच्या समोर ऊस तोडीच नविन संकट डोळ्यासमोर आल आहे. शेतकऱ्यांनी कुणी १० या महिन्यांमध्ये कोणी 11 या महिन्यामधील ऊस लावगड केलेली आहे. त्याची नोंद येवुन दोन महिने उलटले सध्या बारावा महिना चालू आहे. तरी कोणताही साखर कारखाना ऊस तोडी ची टोळी टाकण्यासाठी तयार नाही त्यामुळे बळीराजा पक्का संकटामध्ये अडकला आहे. मागील वर्षी बेट सांगवी मधली 80 टक्के शेत जमिनी मध्ये ऊस लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. आत्तापर्यंत बेटसांगवी मधील ऊस नाही दोन हेक्टर ऊस तुटला नाही बारावा महिना चालू आहे. मागील चार पाच वर्षापासून बाहेरचे साखर कारखाने ऊस उसासाठी येत होते. शेतकऱ्याला मागत होते टोळ्या टाकीत होते. मात्र यावर्षी एकही साखर कारखाना फिरकायला तयार नाही. शेतकऱ्याच्या उसाच्या अडचणी लक्षात घेताच, मोहन नगर कुंटूरकर शुगर अग्रो प्रा.लि. ता. नायगाव जि. नांदेड बाहेरचा गेटकिंग च्या साखर कारखान्याची दिगंबर वानखेडे (पत्रकार )यांनी घेतली भेट व कुंटूरकर साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी , व ऊस पुरवठा अधिकारी हरी पाटील डोईफोडे ईजत गावकर, कृषी सहाय्यक दिलीप पाटील कुदळे कर, यांच्यासोबत चर्चासत्र केले शेतकऱ्याच्या उसाची हाकिगत यांना सांगितले ऊस पुरवठा अधिकारी हरी पाटील डोईफोडे यांनी शेतकऱ्याच्या उसाच्या अडचणी ऐकताच त्यांनी फोनवर त्यांच्या स्लीपभाई सुरेश वानखेडे यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यास सांगितले. व शेतकऱ्याला दिलासा दिला. ऊस पुरवठा अधिकारी शेतकऱ्याला म्हणाले यावर्षी कुंटूर साखर कारखाना चालु व्हायला थोडा वेळ लागला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उस तोडण्यासाठीथोडा वेळ लागला, ऊस घेऊन जाणार म्हणून शेतकऱ्याला आश्वासनही दिले . त्यामुळे निरास झालेल्या शेतकऱ्याच्या गालावर हसू उमटले आहे. साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी हरी पाटील डोईफोडे ईजत गाव गावकर, कृषी सहाय्यक दिलीप पाटील कुदळे कर, उत्तम पाटील तोडे अंतर गावकर, शिवाजी पाटील मंगुळकर, बरेच अधिकारी व इतर शेतकरी उपस्थित होते.