
दैनिक चालु वार्ता,
शहादा प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा : प्रहार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना शाखा- शहादा जि.नंदुरबार यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना निवेदन प्रहार शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांच्या शिष्टमंडळाने दिले.
या निवेदनात प्रमुख मागण्या- उच्च शिक्षण कार्य पुर्व आणि कार्योत्तर परवानगी देण्यात यावी.सातवा वेतन आयोग २ रा हप्ता मिळणे बाबत,प्रलंबित मेडिकल बीलांची फाईल निकाली काढण्यात यावे,प्रलंबीत स्थायित्व प्रमाणपत्र बाबत,एनपीएस बांधवांचे सीएस आर एफ फार्म तात्काळ जिल्हास्तरावर प्रस्तावित करणे बाबत.सेवापुस्तक नोंदी करण्यासाठी केंद्रस्तरावर शिबीर आयोजित करण्यात यावे.आदी प्रश्नांवर बीडीओ साहेबांनी सविस्तर चर्चा केली आणि लवकरच सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील असे ठोस आश्वासन साहेबांनी प्रहार शिक्षक संघटनेस दिले आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम अलट, सचिव मन्मथ बरडे, जिल्हा संघटक तानाजी नवगिरे, कोषाध्यक्ष ज्ञानोबा सुरनर, तालुका संघटक शक्ती धनके, प्रकाश जाधव, मुख्य सल्लागार विक्रम मोहारे, सहसचिव विठ्ठल कुरे,तसेच जयवंत जोशी, नाना कोळी, उमाकांत गौंड आदी उपस्थित होते