
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर संतोष मंनधरणे.
देगलूर : नांदेड हुन देगलूर मार्गे हैदराबाद कडे गव्हाणे भरलेला ट्रक काळ्याबाजारात विक्री साठी जात असल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच देगलूर पोलिसांनी दि. 21डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता खानापूर एमआयडीसी जवळ पकडला आहे. यामध्ये २९४ किंटल तथा ३० टन ज्याची किंमत सहा लाख ७०हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
नांदेड येथील चंद्रकांत ट्रेडिंग कंपनी मोंढा येथून गव्हाणे भरलेला ट्रक क्रमांक एम एच २६ बी ई ६८३६ देगलूर मार्गे हैदराबाद कडे काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून देगलूर पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांना मिळाली . त्या माहितीनुसार देगलूर पोलिसांनी दि. २१ डिसेंबरच्या रात्री नऊ वाजता खानापूर एमआयडीसी जवळ पकडला. पकडलेल्या ट्रक मध्ये ५९० बॅग गव्हाणे भरलेल्या होत्या अर्थात २९४ किंटल गहू ज्याची किंमत ६ लाख ७० हजार रुपये असा मुद्देमाल व ट्रक चालक बालाजी राजाराम रेडेवाड रा. बरबडा तालुका नायगाव यास पकडून देगलूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे .
पुढील कारवाईसाठी येथील तहसीलदार यांना पत्र पाठवून अहवाल मागितला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी दिली आहे. सदरील ट्रक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर गडीमे बीट जमादार केंद्रे व पोलिस कर्मचारी मोरे यांनी पकडले आहे. विशेष म्हणजे हा ट्रक नांदेड येथील एका बड्या राजकीय नेत्याच्या पुतण्याचा असल्याचे सांगण्यात येते. या कारवाईमुळे अवैधरित्या गव्हाची तस्करी करणा-या चालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.