
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ पिंपरी प्रतिनिधी
पुणे-: शिवसंग्राम पक्षाचे पूणे शहराध्यक्ष मा.बाळासाहेब चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा (वाढदिवस) मा आ. आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थिती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. तरी या सोहळ्या दरम्यान कोशिल्डचा पहिला व दुसरा डोस या ठिकाणी मिळणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिव संग्राम पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. दरम्यान या अभिष्टचिंतन सोहळ्यात सुमारे पाचशे पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहेत. या सोहळ्यात समाजभूषण पुरस्कार,कोविडयौद्धा पुरस्कार, प्रमाणपत्रे, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, नियुक्तीपत्र, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबवून बाळासाहेब चव्हाण यांचा वाढदिवस साजरा होणार आहे तरी या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती मा.आमदार विनायकराव मेटे, उदयकुमार आहेर,भरतसेठ लगड, सागरदादा शिंदे, दीपकभाऊअण्णा, अभिनेत्री निशिगंधा कुन्ते, अमोलभाऊ हुलावळे, दीपक पोकळे यांची उपस्थिती राहणार आहे.सदरील वाढदिवसाचा कार्यक्रम हा दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी साईनाथनगर अभिनव कॉलेज समोर न-हे येथे होणार आहे. असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.