
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ पिंपरी प्रतिनिधी
पुणे– येथे झालेल्या सोळाव्या कार्यशाळेत भारताच्या वैभवशाली, प्राचीन इतिहासाला जाणून घेण्यासाठी आणि बुध्द लेणींची जनजागृती करण्यासाठी मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम ने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
मार्गदर्शक व इतिहास उलगडणारे असे कोणीच नव्हते; पण आता खऱ्या अर्थाने ती सुरुवात मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम च्या मार्फत झाली आहे. लेणीच्या निर्मिती मागील इतिहास, तत्कालीन सामाजिक संरचना, कालखंडानुसार अतिक्रमणे, शिल्पांचा अर्थबोध, धम्मलिपि या बाबी मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीम च्या मार्फत कळू लागल्या आहेत. संशोधनाची अपूर्ण भूक आता आणखी वाढलीय हे असे मनोगत उपस्थित धम्म बांधव व भगिनींनी व्यक्त केले.
मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, परभणी, जालना सह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून शेकडो लेणीसंवर्धक या कार्यशाळेला उपस्थित होते.
शेलारवाडी बुध्दलेणी ही अतिक्रमित लेणी असून या ठिकाणी ३ लेणींवर अतिक्रमण केलेले आहे ही लेणी हीनयान पंथीयांच्या शेवटच्या अखेरच्या काळातील ही लेणी आहे असे या लेणीच्या रचना आणि व वैशिष्ट्यांवरून समजते. ही लेणी पुणे येथून २५ किलोमीटरवर देहूरोड जवळ असून याठिकाणी ११ लेण्यांचा समूह आहे. शेलारवाडी लेणीच्या समूहात एकच चैत्य असून या दालनात ९ खोल्या आहेत. पूर्वी या दालनात स्तूप होता परंतु त्या ठिकाणी स्तूप तोडून तिथे घोरवडेश्वर शिवलिंग ची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वी तिथे स्तूप होता हे छताला धरून राहिलेल्या हर्मिकेवरून आपल्याला पहावयास मिळते. या लेणीमध्ये दोन शिलालेख आपल्याला स्पष्टपणे पहावयास मिळतात त्यामधील चैत्यगृहात असलेल्या शिलालेखात *बुध्दचचेतीयघरो* असा उल्लेख आढळतो. येथील सर्व शिलालेखांचे वाचन व अर्थ आनंद खरात आणि मनोज गजभार यांनी सांगितले. लेणीची थोडक्यात माहिती सागल गायकवाड यांनी सांगितली. आपण लेणीवर न आल्यामुळे अश्याप्रकारची अतिक्रमणे होत राहतात या बद्दल प्रभाकर जोगदंड आणि संतोष वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. या ठिकाणी सर्व लेणीसंवर्धक सामूहिक बुध्दवंदना घेऊन पुन्हा इतर कोणत्याही लेणीवर अश्याप्रकारे अतिक्रमण होणार नाही असा संकल्प करून बेडसे लेणीकडे रवाना झाले.
बेडसे लेणी म्हणजे मारकुट (मारा याचा पर्वत) असे या लेणीमधील शिलालेखांमधून समजते. बेडसे लेणी ही पूर्वाभिमुख खोदलेली आहे. बेडसे लेणीसमुहात तीन चैत्यगृह यापैकी एक अर्धवट अवस्थेत आहे, एक भव्य विहार, दोन छोटे विहार तर त्यातील एक अर्धवट अवस्थेत आहे. सहा पाण्याच्या (पोढ्या) टाक्या या लेणीसमूहात कोरलेल्या आहेत. बेडसे लेणीचे सौंदर्य चैत्यगृहात आणि आगळ्यावेगळ्या विहारात आहे. ही लेणी हीनयान पंथातील असून लेणीचे खोदकाम हे इ. स. पूर्व पहिले शतक ते इ. स. पहिले शतक या कालखंडात चालू होते. बेडसे लेनिसमूहात एकूण १३ लेणी आहेत या विषयी माहिती प्रभाकर जोगदंड आणि विकास खरात यांनी सांगितली. शिलालेखांची माहिती, त्याचा अर्थ मनोज गजभार आणि आनंद खरात यांनी सांगितला. सूत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले, मुव्हमेंट ऑफ बुद्धिस्ट केव्ज प्रिजरवेशन अँड रिस्टोरेशन टीमची वाटचाल आणि ध्येय शशिकांत निकम यांनी सांगितले. बुद्ध धम्मतील १० पारमिता पैकी सर्वात महत्त्वाची पारमिता म्हणजे दान पारमिता, तिचे महत्व संतोष आंभोरे यांनी समजावून सांगितले. प्रवीण जाधव यांनी आलेल्या सर्व लेणीसंवर्धकांचे आभार मानले.
या कार्यशाळेत विजय कापडणे, आशिष भोसले, रितेश गांगुर्डे, रवी कांबळे, पांडुरंग सरकटे, अशोक बडेकर, चंद्रकांत बोचकुरे, शुद्धोधन बागडे, अजय तांबे, महायान मसुरे, गिरीश साबळे, राहुल कांबळे, हर्षद बडेकर,कपिल कांबळे, सिद्धू कांबळे, राजेश सरतापे, ज्ञानेश्वर सावंत, राहुल पटेकर व इतर सर्व लेणी संवर्धक आत्मीयतेने उपस्थित होते.