
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि ग्राहक व्यवहार आणि वस्त्रोद्योग मंत्री, श्री पीयूष गोयल तसेच श्री डॅन तेहान एम पी, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूक मंत्री, ऑस्ट्रेलिया यांनी द्विपक्षीय सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या (सीईसीए) वाटाघाटींना गती देण्यासाठी या आठवड्यात चर्चा केली.
मंत्री महोदयांनी, 21 डिसेंबर 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान, दोन्ही बाजूंच्या मुख्य धुरीणांमधील चर्चेच्या विविध फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रगतीचे कौतुक केले आणि अंतरिम कराराच्या निष्कर्षापर्यंत लवकर पोहोचण्याबाबत चर्चा केली.
या संदर्भात, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापार चर्चा प्रगती पथावर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या संदर्भातील प्रतिबद्धता अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला तसेच सर्वसमावेशक कराराचा मार्ग मोकळा करण्यासाठी वाटाघाटींना गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांना फायदा होईल तसेच नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणालीसाठी त्यांची सामायिक वचनबद्धता दर्शवणाऱ्या संतुलित व्यापार करारावर काम करण्याबाबत उभय मंत्री महोदयांनी सहमती दर्शवली.