
दै. चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानामपूर येथील श्रीमती रेखा महादेव केदार यांना गेल्या १० वर्षापासून ब्रेन ट्युमरचा आजार असतांना दोनदा ट्युमरचे ऑपरेशन झाले परंतु अयशस्वी ठरल्याने पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबई येथे तिसऱ्यांदा ऑपरेशन करिता पाऊल उचलले.डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च ४ लाख रुपये सांगितला परंतु आर्थिक परिस्थिती नसतांना ऑपरेशन होणार नव्हतं.यावेळी रुग्ण श्रीमती रेखा केदार यांचा मुलगा आकाश याने स्थानिक प्रहार संघटनेचे कार्यकर्ते गोपाल शिंगणे यांची प्रहार कार्यालयात जाऊन भेट घेतली असता गोपाल शिंगणे यांनी २७ नोव्हेंबरला राज्यमंत्री बच्चू कडू यांची परतवाडा येथे भेट घेतली.त्यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णाला जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे मोफत उपचारासाठी पाठवले असता काल त्या महिलेचे ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले.ऑपरेशन मोफत झाल त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी एका पत्राद्वारे प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख श्री.शंभुराजे मालठाने व शाखा प्रमुख गोपाल शिंगणे यांचे आभार मानले.