
दै. चालु वार्ता
नांदेड गोविंद पवार
आजच्या दिवसाचे निमित्त साधून सायाळ जि. प. प्रा शाळा सायाळ मध्ये प्रगतीशील युवा शेतकरी रत्नाकर पाटील ढगे (सायाळकर) यांचे जि प प्रा शा सायाळ येथिल शिक्षक कांबळे सर, मुल्ला सर, शेख सर डांगे मॅडम, माणे मॅडम, बोराडे मॅडम आणि स्वामी मॅडम यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पहार भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विषमुक्त अन्न निर्मीती विषयी सखोल मार्गदर्शन केले. व सोबतच रासायनिक शेतीतून मानवी आरोग्यावर होणार्या दुष्परिणामा विषयी माहिती दिली. त्या मध्ये शेतात पसरून दिलेले रासायनिक खते पाण्यासोबत वाहुन व झिरपून बोरवेल असो की विहीर अशा पिण्याच्या पाण्यात मिसळून मानवी शरीरात जाऊन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विषद केले.
या मार्गदर्शनाचे कौतुक यावेळी उपस्थित शिक्षकांनी केले. जागतिक किसान दिवशी एका प्रयोगशील शेतकर्याचा सन्मान झाल्यामुळे खर्या अर्थाने आजच्या दिवसाचे सार्थक झाल्याच सर्वांना वाटु लागले.