
दैनिक चालु
किनवट प्रतिनिधी
वार्ता दशरथ आंबेकर
राज्यातील आदिवासी संस्कृती व कलावंतांच्या साहित्य संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन जयवंत वानोळे यांनी सांगितले.
स्वप्नपूर्ती अभियानांतर्गत माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील आदिवासी कला संचने 20 डिसेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ निवास्थानी पारंपारिक आदिवासी ढेमसा नृत्याचे सादरीकरण करून त्यांची भेट घेतली यावेळी राज्य समन्वयक जयवंत वानोळे यांनी राज्यातील आदिवासी संस्कृती व कलावंतांच्या प्रश्नावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर आदिवासी संस्कृती व लोककला जपणुकीसाठी आदिवासी क्षेत्रात संग्रहालय स्थापन करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी त्यांनी दिले
स्वप्नपूर्ती अभियानांतर्गत राष्ट्रवादीचे राज्य समन्वयक तथा आदिवासी नेते जयवंत वानोळे यांच्या नेतृत्वाखाली माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील आदिवासी ढेमसा नृत्य संचाने 20 डिसेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी पारंपारिक मोरपीसटोपधारण केलेल्या ढेमसा नृत्याचे सादरीकरण करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली याप्रसंगी राज्य समन्वयक जयवंत वानोळे यांनी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी संस्कृती कला व कलावंतांच्या विविध प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा केली आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी कलावंत ठिकठिकाणी पारंपरिक कार्यक्रम आयोजित करतात परंतु त्यांना शासनाचे कोणतेही अर्थसाहाय्य मिळत नसल्याची बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आदिवासी संस्कृतीला चालना देण्यासाठी राज्यातील आदिवासीबहुल भागात लवकरच साहित्य संग्रहालय उभारले जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती वानोळे यांनी दिली आहे
याप्रसंगी लोकरवाडी येथील आदिवासी ढेमसा मृत्य संचाचे भारत कोडापे,प्रमोद मडावी, दत्ता धुर्वे, अमोल सिडाम,अंकुश मडावी, कीर्तिराज कोडापे,राहुल गेडाम, विवेक कोडापे, विशाल कोडापे,ऋत्विक गेडाम, अनिकेत तोडसाम, लहू धुर्वे आदी उपस्थित होते.