
दै. चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी–सुशिल घायाळ
दि.23 मंठा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021साठी एकूण तेरा प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. तर उर्वरित एकूण चार प्रभागासाठी मा. सर्वोच्च न्यायालययाच्या निकाला नुसार ओ.बी.सी.आरक्षणाला स्थगिती देऊन हे प्रभाग आता सर्वसाधारण मधून निवडणूक लढवली जाणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन, तीन,चार व नऊ यासाठी आरक्षण सोडत आज दिनांक 23 वार गुरुवारी रोजी पार पडली.त्यापैकी सर्वसाधारण महिला प्रवर्गा साठी प्रभाग चार व नऊ आरक्षित करण्यात आले. यावेळी सारंग उमेश भावसार व सोहम रमेश खंदारे या लहान मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उत्सुक उमेदवार, नागरिक, पोलीस,पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती.