
दै. चालु वार्ता
नांदेड / गोविंद पवार
शिवणी : – धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक – ३ शिवणी ( जा ) येथील कारखान्यातुन निघणारा विषारी धुर हा परीसरातील जनसामान्य व्यक्तीच्या अरोग्याला काळ ठरला असुन हा विषारी वायू सामान्य व्यक्तीचा जिवघेणा ठरणारा असुन या समस्येला आवाज देणार कोण व परीसरातील स्थानिक पुढारी व प्रतिनिधी मुग गिळुन गप्प का असा सवाल सामान्य जनतेच्या तोंडातुन ऐकावयास मिळत आहे.
◼️कारखान्याच्या विषारी वायुमुळे परीसरात जनजिवन विस्कळीत
कारखान्याच्या धुरामुळे परीसरातील विहीरीमध्ये पाण्यावर तवंग येत असुन तेच पाणी शेतकरी गुरा धोरांना पाजवत आहे व ते स्वतःता शेतीकाम करत असताना पित असल्याने या दुषीत वायुने व या पाण्याने अनेक आजार होण्याचे नाकारता येत नाही. व शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस पण या धुरामुळे काळा होत आहे याचा फटका बळीराजाला सोसावा लागत आहे . खेड्यातील महिलावर्ग घरातील कपडे धुवून घतावर वाळु घालत असतो ते कपडे पण काळे होत आहेत या धुरामुळे परीसरातील जनतेला विविध समस्यांवर तोंड द्यावे लागत आहे.
◼️कारखान्याच्या अवडज वाहतूकीमुळे रस्त्याची दुरवस्था
शेवडी परीसरातील तलावा पाणी टॅक्टरने अट्या खडे पडल्याने सामान्य जनतेला तारेवरची कसरत करावी लागत आहे . या खड्यामुळे अनेक वेळा अपघात पण घडले व राञीच्या वेळेस एखाद्या प्रवाश्यांना खड्डा चुकवता अला नाही तर जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे . वरील सर्व समस्या कारखाने दोन दिवसांत मिटवल्या नाही तर परीसरात सामान्य जनतेने रस्त्यावर लवकर उतरण्याचा निर्णय घेतला असुन तातडीने समस्या न मिळाल्यास कारखान्यावर आंदोलन करून कुलुप ठोकले जाईल असा इशारा परीसरात जनतेने दिला आहे