
दैनिक चालु वार्ता
परतूर /प्रतिनिधी नामदेव तौर
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. कर्नाटकातील बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करने हा महाराष्ट्राचा अपमान असून या प्रकारामुळे
परतूर मध्येच नव्हे तर जगभरातील जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी
छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती परतुर यांच्या मार्फत करण्यात आली.
23 डिसेंबर रोजी परतूर तहसील व पोलीस ठाणे परतुर इथे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी
सचिन बिडवे, ज्ञानेश्वर तनपुरे, केदारेश्वर मानवतकर, योगेश मुजमुले, आदित्य मानवतकर, भरत बिडवे, रंजीत बिडवे, रोहन जाधव, अक्षय बिडवे, श्याम बिडवे ,महेश बिडवे ,विकास बिडवे, कृष्णा बिडवे, मोतीराम तायडे ,आदित्य बिडवे ,नागेश बिडवे, राम लाटे. उपस्थित होते.