
दैनिक चालु वार्ता
परतूर/ प्रतिनिधी नामदेव तौर
प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी ता. परंतुर इथे आशा वर्कर यांची मासिक बैठक झाली.
या मध्ये सर्व आशाच्या सक्षम बाल विवाह निर्मूलन प्रशिक्षण देण्यात आले.
त्यामध्ये बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली.
प्रत्येक गावामध्ये गाव बाल संरक्षण समिती (VCPC) स्थापन करण्यात येणार असुन त्याबदल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
मुलीच्या लग्नाचे वय 18 वरून 21 ठरवण्यात आले आहे याबद्दल माहिती देण्यात आली
त्याच प्रमाणे मुलीच्या शिक्षणावर भर देणे, मुलीच्या आहाराकडे लक्ष देणे.
मुलीने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यावी यासाठी मुलीचे व तिच्या पालकांचे
समुपदेशन करणे याबद्दल माहिती दिली.
जर आपल्या कार्यतेयामध्ये मुला-मुलीवर अन्याय होत असेल तर हेल्पलाईन 1098 ला कॉल करणे याबद्दल सांगण्यात आले
कमी वयात लग्न झाल्यावर होणारे दुष्परिणाम, छळ, अत्याचार, व त्यातुन मुलीचे शारिरिक व मानसिक किती नुकसान होते.
आपल्या कार्यक्षेत्रात कुठे बालविवाह होत असेल तर ग्रामसेवक, सरपंच, शिक्षक, अंगणवाडी, आशा, यांना सर्वांना कळवावे व योग्य ती कारवाई करण्यास आपण मदत करून बालविवाह रोखु शकतो.
याबद्दल यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणास यावेळी 31 आशा, 2.B.F, 2 CHO, 2 H.अ, 1-AHM असे एकूण 38 कर्मचारी उपस्थीत होते.