
दै. चालु वार्ता
नांदुरा तालुका, प्रतिनिधी. किशोर वाकोडे
देि.23 शेंबा बु. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे लक्ष्मीनारायण मंदिर तसेच गणपती मंदिर,व शेंबा बस स्टॉप वरच अनधिकृतपणे दारू विकली जात आहे. यामुळे प्रसिद्ध देवस्थान असलेले लक्ष्मीनारायण मंदिर तसेच गणपती मंदिर या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामस्थांना याचा मनस्ताप, त्रास होत आहे. याबाबत शेंबा गावात महिलांनी दोन महिन्या अगोदर ग्रामसभेला दारूबंदीचे निवेदन दिले होते त्यानुसार ग्रामसभेच्या माध्यमातून दारूबंदी करण्यात यावी यासाठी ग्रामसभेचा ठराव पारित झाला होता परंतू दोन महिने उलटूनही दारू बंद झाली नाही. दारुमुळे शेतमजूर आणि गोरगरीब,तरुण वर्ग सुध्दा दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यावर प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु अनधिकृत(दारू,मटका) व्यवसाया वाले मुजोर झाले असून प्रशासन व ग्रामपंचायतला न जुमानता सर्रासपणे दारू विक्री चालू आहे. त्यासाठी शेंबा ग्रामपंचायत वतीने आमरण उपोषण दि. 23 /12 /2021 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून शेंबा बस स्टॉप वर सुरु करण्यात आलेले आहे. या उपोषणास शेंबा ग्रामपंचायत सरपंचॲड नंदकिशोर खोंदले ( सरपंच) ,
जगन्नाथ भोपळे (उपसरपंच) ,
सुरेंद्र चौधरी (ग्रामपंचायत सदस्य), प्रवीण भिडे (ग्रामपंचायत सदस्य), विजय इंगळे (ग्रामपंचायत सदस्य) शेख जब्बार शेख आतार (ग्रामपंचायत सदस्य) कैलास सुशिर (ग्रामपंचायत सदस्य) ,सुधाकर बोरकर (ग्रामपंचायत सदस्य) सुनील पाटील (शिवसेना तालुका उपप्रमुख) इत्यादी मंडळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत शेंबा बु. परिसरातील अवैद्य धंदे बंद होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही . अशे उपोषण कर्ते यांच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी पं, स. सदस्य संजय सिंग जाधव,पो.पा.सुधाकर तायडे,तसेच शेंबा गावकरी मंडळी उपोषणाचे समर्थन करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.