
दैनिक चालु वार्ता
(कंधार लोहा )विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
कंधारःस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व श्री.शिवाजी कॉलेज ,कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ डिसेंबर रोजी एकदिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक उत्तम कांबळे यांचे’वसा विचारांचा-फुले-शाहु-आंबेडकरांचा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.शिवाजी कॉलेज कंधारच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माजी खा.डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन श्री.शिवाजी कॉलेज,कंधारच्या मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.राष्ट्रीय चर्चाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा माजी आ.भाई गुरूनाथराव कुरूडे राहतील. व्याख्याते म्हणून साहित्यिक उत्तम कांबळे तर उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरूषोत्तम धोंडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे तर बीजभाषण डॉ. साहेब खंदारे यांचे राहील. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पुरूषोत्तम धोंडगे तर विशेष उपस्थिती संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव पेठकर यांची राहणार आहे.
एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे प्राचार्य डॉ. जी.आर.पगडे, प्रा.डॉ. सावंत ,प्रा.डॉ. पुजारी ,प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड संयोजन समितीचे प्रो.डॉ. गंगाधर तोगरे ,प्रा.डॉ. आर.पी.कासार ,प्रा.डॉ. एम.आर.कदम ,प्रा.डॉ. ठाकूर, प्रा.डॉ. एस.पी.राठोड, प्रा.डॉ. डी.पवार ,प्रा.एस.पी.गुट्टे ,प्रा.डॉ. पी.व्ही.पांचाळ ,प्रा.डॉ. शिवाजी भागानगरे ,प्रा.व्ही.एस.पेरके आदीनी केले आहे.