
*दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड*
*विठ्ठल रुक्माई संस्थानचे अध्यक्ष ह भ प मधुकर महाराज बारुळकर यांनी भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.*
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की बारुळ तालुका कंधार येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या वाढदिवसा निमित्ताने अखंड हरिनाम सप्तह ज्ञानेश्वरी पारायण मार्गशीर्ष वद्य 5 दि. 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर रोज शुक्रवार पर्यंत चालणार आहे. तरी या निमित्ताने महाराष्ट्रातील थोर संताचे कीर्तनाद्वारे समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित केले आहेत. तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांनी आवाहन केले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकड आरती 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 10 ते 12 गाथा भजन दुपारी 2 ते 4 भोजन व विश्रांती दुपारी 4 ते 5 ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 9 ते 11 हरिकीर्तन असे आयोजित केले आहे.
दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा शुक्रवार दिनांक 24 डिसेंबर रोजी
ह.भ.प. मैनाताई हिपळनारीकर रात्री नऊ ते अकरा यांचे कीर्तन आहे. शनिवार 25 डिसेंबर रोजी ह.भ.प. निरगुनाताई इंगळे परभणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. रविवार 26 डिसेंबर रोजी ह.भ.प. अंजलीताई केंद्रे निलंगा यांचे कीर्तन आहे. सोमवार 27 डिसेंबर रोजी ह.भ.प. संतोष महाराज कुशावाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. मंगळवार 28 डिसेंबर रोजी ह.भ.प. शौकत महाराज शेख, निलंगा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. 29 डिसेंबर रोजी ह.भ.प. माधव महाराज बोरगडीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे. 30 डिसेंबर रोजी ह.भ.प. ज्ञानोबा माऊली आरबुजवाडीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे.
मीती मार्गशीष वद्य 12 दिनांक 31 डिसेंबर रोजी शुक्रवार सकाळी 10 ते 12 ह.भ.प. श्री ज्ञानोबा माऊली आरबुजवाडीकर यांच्या काल्याचे किर्तन व लगेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती. या कार्यक्रमासाठी भजनी मंडळ वळसंगवाडी, सावळेश्वर, धर्मापुरी, नंदनवन, तांदळी, लाट खुर्द, रायवाडी, दैठणा, सिरसी, बारूळ या ठिकाणच्या भजनी मंडळाची उपस्थिती राहणार आहे. मृदंगवादक ह.भ.प. श्री बाजीराव पाटील कदम आळंदीकर यांची उपस्थिती राहणार आहे. श्री हनुमान मंदिर व विठ्ठल मंदिर संस्थान बारूळ व गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.