
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
निर्जनस्थळी हातरुमालावर, प्लॅस्टिक पिशवीत “स्टीक फास्ट’ टाकून नाका-तोंडावाटे हुंगायचे आणि नशा करायची पद्धत आहे. शहरातील जिल्हा परिषद शाळेचे मैदान,पशुवैद्यकीय दवाखाना मैदान, लासुर मार्गावरील स्टेडियम येथे सदर प्रकार सर्रास घडत आहेत.
दोन दिवसांपूर्वी वैजापूर मार्गावर स्टीक फास्ट’च्या नशेमुळे चालता चालता रस्त्याच्या कडेला असलेल्या गटरमध्ये पडलेल्या अल्पवयीन मुलाला आमच्या ग्रुपच्या सदस्यांनी उचलून मलम पट्टी करून घरी सोडले होते. आमच्या सदस्यांनी या पार्श्वभूमीवर “स्टीक फास्ट’चा माग घेतला असता यात विशेषतः लहान मुले “स्टीक फास्ट’च्या आहारी गेले आहेत. दुसरी- तिसरी ते पाचवी- सातवीपर्यंतचे विद्यार्थी, शाळाबाह्य मुले या नशेत गुरफटली आहेत.
शाळा- महाविद्यालयाच्या परिसरात विक्री होत असल्याची माहिती समोर आली. शैक्षणिक “प्रोजेक्ट’ किंवा तुटलेल्या वस्तू चिटकविण्यासाठी “स्टीक फास्ट’ लागत असल्याची बतावणी करून ते नशेसाठी असंख्य लहान मुले, युवक खरेदी करताना दिसत आहे. हा प्रकार वेळीच थांबला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे व अशा मुलांच्या आई वडिलांना समज द्यावी . आपणास या कामी वालीयंटर ची आवश्यकता असल्यास आमचा ग्रुप आपणास सहकार्य करण्यास तयार आहे. अशी मागणी साम्राज्य ग्रुपचे जुबेर लालखा पठाण, अरबाज शहा, रिझवान खान, शारिक सय्यद, अजय खरात, दावूद बाशवान, सलमान शेख, दत्तू लांडे यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.