
दैनिक चालू वार्ता
रायगड प्रतिनिधी. प्रा. अंगद कांबळे
भापट/म्हसळा :दि. २० डिसेंबर २०२१ रोजी
कोळवट गृप ग्राम पंचायतीचे उपसरपंच स्व.रविंद्र दाजी कुवारे यांच्या उत्तरकार्य च्या दिवशी ठिकाण भापट कुवारे यांच्या निवासस्थानी परिवाराची विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. अनिकेतजी तटकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
भापट गावचा सर्वांगिण विकास करत असता बहुजन वर्गाला सोबत घेऊन रविंद्र कुवारे यांनी काम केले. खेडोपाड्यातील लोकांचे प्रश्न मांडून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सोडवले. वेळोवेळी विद्यमान खासदार तटकरे साहेब, पालकमंत्री अदिती ताई तटकरे, जिल्हा कृषी सभापती बबन मनवे, सभापती छायाताई म्हात्रे उपसभापती संदिप चाचले ,पं स सदस्य मधुकर गायकर यांच्या सोबत सतत पाठपुरावा करत गावातील आणि परिसरातील कामे करून घेतली. रविंद्र कुवारे हे अत्यंत शांत , संयमी आणि मनमिळावू स्वभावाचे व्याक्तिमहत्व होते. त्यांच्या या अकाली निधनाने कुवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर कुवारे परिवाराला बळ देवो यासाठी सर्वच स्तरातून सांत्वन होते आहे.
यावेळी विधानपरिषदेचे आमदार मा श्री अनिकेत भाई तटकरे यांनी कुवारे यांच्या घरी जाऊन भेट दिली. आणि दुःखातून सावरण्यासाठी आधार दिला
यावेळी आ. मा अनिकेत भाई तटकरे, उपस्थित होते. सोबत म्हसळा पंचायत समितीचे उपसभापती संदिप चाचले, गण अध्यक्ष संतोष सावंत, अनिल बसवत गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, जेष्ठ नथुराम घडशी, नवाज नजिर,पांडुरंग जाडे, रोहित कुवारे, जयसिंग बेटकर, रामचंद्र कुवारे, गजानन पाष्टे, लक्ष्मण मोहिते, कमलेश बेटकर , मोहन भोसले, परशूराम भोसले,अनंता पारदळे, दिलीप गावडे, अनता अलिम सत्तार नजिर, बबन मोहिते,प्रमोद बेटकर,सोनू जोशी, संतोष भोसले आणि ईतर परिसरातील नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी संघर्ष बौध्दजन युवा मंडळ मुंबई व स्थानिक भापट, माता रमाई महिला मंडळ भापट, ग्रामस्थ मंडळ भापट मुंबई,ग्रामीण, उत्कृष्ट महिला मंडळ भापट,ओम शिव सत्य क्रिकेट संघ भापट, गृप ग्राम पंचायत कोळवट, कुणबी समाज ठाकरोळी विभाग मुंबई, दक्षिण विभाग कुणबी समाज म्हसळा यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.