
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर संतोष मंनधरणे.
देगलुर .. (दि. 23 डिसेंबर,2021) जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी बांधव काम करीत आहेत, केवळ अन्नदाता म्हणूनच नव्हे तर एकूणच आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांच्या सेवाकामाप्रती सन्मान आणि कृतार्थ भाव व्यक्त करण्यासाठी ब्रह्माकुमारीज् ग्रामविकास प्रभागातर्फे संपूर्ण देशात किसान सन्मान दिवस साजरा करण्यात आला.
देगलुर येथील ब्रह्माकुमारीज् स्थानिक सेवाकेंद्रात या निमित्ताने शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगाचा अन्नदाताच नव्हे तर एकदरीत देशाच्या सर्वांगिण विकासाचा कणा असणा-या शेतकरी बंधू-भगीनींच्या कामाप्रती, त्यांच्या श्रमास अभीवादन आणि सन्मान करण्याच्या दृष्टीने त्यांचा सेवाकार्याचा यथोचित गौरव व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय किसान दिवसाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि त्यांची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन आणि रिसर्च फाऊंडेशनच्या ग्रामविकास प्रभागातर्फे येथील स्थानिक सेवाकेंद्रात शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक व देगलुर तालुका परिसरातील शेतकरी बांधवांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान प्रंसगी आपले समयोचित मनोगत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरानी व्यक्त केली. त्यात किसान भारती प्रदेश आध्यक्ष व माजी आमदार श्री शंकरअण्णा धोंडगे , माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव देशमुख , क्रुषि अधिकारी सोमेश्वर गिरी भाईजी ,नगर सेवक शैलेश ऊल्लेवार , अनिल पाटील रामपुरकर , पी. आय. सोहम माचरे भाईजी , डॉ.शंकर पाटील . यांचा समावेश होता. ब्र.कु. लक्ष्मी (मेनका ), यांनी कार्यक्रमाचा आणि ग्रामविकास प्रभागाचा उद्देश सांगितला. ब्रह्माकुमारीज् तर्फे जगाच्या पोशींद्याचा यथोचित कार्यगौरव होणे हा एक भाग्याचा क्षण आहे अशी भावना व्यासपिठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. शेन्द्रिय शेती करणाऱ्यांचा सत्कार मेनका बहेन्जि , विद्या बहेन्जि , शंकर अण्णा धोंडगे आदींच्या शुभहस्ते करण्यात आला यात राजेश पणदर्गे , डॉ. शंकर पाटील , हणमंत पाटील गौजेगाव , रफाई भाई आळंदी , युवराज देशमुख शिळवनी , राजु पाटील काठेवाडी गजानन बामने मन्सकर्र्गा , रमेश पाटील वनाळीकर , माधव व्यंकटराव पाटील कुशावाडी , शिवाजी पाटील लोणी , अनुजा पाटील गाण्धारीकर हर्ष पाटील यां शेतकऱ्याचा समावेश होता …या वेळी शेतकऱ्यांना पाचशे हुन अधिक झाडे देण्यात आली …
या प्रसंगी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी विद्या बहेन्जि यांनी ग्रामविकास प्रभागातर्फे आयोजित उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली त्यात शाश्वत योगिक शेती, ग्राम दत्तक योजना, आदर्श ग्राम योजना, निसर्ग आणि मानव मैत्री आदिंचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या बहेन्जि यांनी केले , डॉ. सुनील भाई यांनी सुरुवातीला जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा गीत सादर केले . प्रास्ताविक राम भाईनी केले . तर आभार चंद्रकांत भाई मोरे यांनी मानले.
* * * * * *