
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी कलंबर सर्कल हनुमंत श्रीरामे
नांदेड:जिल्ह्यातील सर्व एमपीएससी परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एम.पी.एस.सी मार्फत होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची परीक्षा ही दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 32 परीक्षा केंद्रावर होणार आहे.या परीक्षेसाठी कलम 144 लागू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसे निर्देश काढण्यात आले आहे.