
दैनिक चालू वार्ता
आटपाडी तालुका प्रतिनिधी
*दादासो वाक्षे*
निंबवडे ता आटपाडी येथे शेतकऱ्याचा सर्जा राजा धावणार आहे, सुप्रीम कोर्टाने नियम व अटी घालून दिलेल्या निकालानंतर पहिल्यांदाच आटपाडी तालुक्यात निंबवडेच्या माळावरती युवा नेते पै संतोष पुजारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे.
पै संतोष पुजारी हे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष असून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचा जनसंपर्क चांगल्या पद्धतीचा आहे, नुकत्याच सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे .
यामध्ये जनरल गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1.11.111, रुपये, दुतीय क्र 55.555,तृतीय क्रमांक 33.333 बक्षीस ठेवले आहेत, तर ब गटासाठी प्रथम क्र 25,000,द्वितीय क्र.15,000, तृतीय क्र.10,000 रुपयाचे बक्षीस ठेवले आहे.
तर जनरल आदत बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक 10हजार रुपये, दुतिय क्रमांक 7 हजार रुपये तृतीय क्रमांक 5 हजार रुपये, तर मिनिट बैलगाडी शर्यत यामध्ये प्रथम क्रमांक 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये, तृतीय क्रमांक 10 हजार रुपये असे भरघोस बक्षिसे लावण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यतीचे आयोजन पै संतोष पुजारी युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे