
दै. चालु वार्ता
नांदेड गोविंद पवार
लोहा महावितरण उपविभागा अंर्गत धोरण २०२० अंतर्गत कृषी पंपाचे संपुर्ण विजबिल लोहा शहर शाखेचे ग्राहक सदानंद कामाजी कापुरे यांनी आज रु.62840/-(बासष्ट हजार आठशे चाळीस)लोहा महावितरण कार्यालयात ग्रामीण महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.आर.पि.चव्हाण यांच्या हस्ते भरुन सदानंद कापुरे यांनी महावितरणला सहकार्य केले म्हणुन महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता आर.पि.चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कारण्यात आला.व आर.पि.चव्हाण हे लोहा उपविभागातील खेडेगावांना 100% विजबिल वसुलीसाठी रोजच भेटी देउन विजबिल वसुलीवर जास्तीचा भर देत आहेत व ग्रामिण भागातील ग्राहकांच्या अडीअडचणी तत्परतेने सोडवण्याचे काम ते युध्दपातळीवर करीत असतात व त्याचाच भाग म्हणुन आज सदानंद कामाजी कापुरे या शेतक-याने कृषीपंपाचे विजबिल भरले आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता आर.पी.चव्हाण सर यावेळी उपकार्यकारी अभियंता सचिन दवंडे, राजकुमार सिंदगीकर,आंबेडकर नॅशनल काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अनिलदादा गायकवाड,किशोर भोळे,ग्रामिण युनिटचे सहाय्यक अभियंता शिवाजी वाघमारे, घरजाळे ,गायकवाड यांची उपस्थीती होती.