
दैनिक चालु वार्ता,
देगलूर प्रतिनिधी,उमाकांत कोकणे
प्रभाग क्र.9 मधील पाठीमागील डी.पी.क्र.70 वरील एकच फिउज चालू असल्याने लोड जास्त होऊन वारंवार वीज खंडित होत आहे व डी.पी.क्र.5 वरील फयाज यांच्या घराजवळचा पोल क्र.13 व पिनलवार राफे यांच्या घराजवळील पोल क्र.7 हा नालीत असल्याने कुजून खराब झाला आहे केव्हाही पडण्याची शक्यता आहे व सरसंबे यांच्या घराजवळील पोल क्र.25 व चिंतले यांच्या घराजवळील पोल क्र.45 लवकरात लवकर बसविण्यात यावे असे निवेदन कार्यकारी अभियंता चटलावार साहेब उपकार्यकारी अभियंता टेकाळे साहेब, मुख्याधिकारी ईरलोड साहेब व उपजिल्हाधिकारी कदम साहेब यांना देण्यात आले.व काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.या प्रसंगी समाजसेवक संजय जोशी व परिसरातील सर्व नागरिक उपस्तिथ होते.