
दै. चालु वार्ता
विभागीय कोरोना मुक्त गाव पुरस्कारासाठी शासनाच्या निकषा नुसार कामे करणार.. अविनाश राठोड
( मंठा )तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच अविनाश राठोड यांनी कोरोना काळात गाव वाचवण्यासाठी जे उत्कृष्ट काम केले त्याची दखल सरपंच सेवा संघ अहमदनगर येतील बाबासाहेब पावसे यांनी घेतली आणि 23 डिसेंबर रोजी माऊली सभाग्रह येथे आचार्य महंत महामंडलेश्वर जगद्गुरु डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, दीपकदादा पाटील, ह-भ-प राधाबाई सानप महाराज, बाबासाहेब पावसे, राधेशाम गुंजाळ, राजाराम भापकर, विजयराव तनपुरे महाराज, माधवराव पावसे, करुणा मुंडे, रोहित पवार आणि ई मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राठोड यांना डिसेंबर महिन्यात राज्यस्तरीय समाज भूषण आणि कोरोना युद्धा अश्या दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून 26 डिसेंबर रोजी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने रायगडजिल्यातील लोधिवली येथें सन्मानित करण्यात येणार आहें. या पुरस्कारामुळे माझ्या कामाला गती निर्माण होईल त्याच प्रमाणे काम करण्या साठी ऊर्जा मिळेल असे राठोड यांनी प्रसार माध्यमासी बोलताना सांगितले.पुढे त्यांनी आपण आगामी काळात विभागीय स्तरीय कोरोना मुक्त गाव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निकषा नुसार कसून कामे करणार असून हा सुद्धा पुरस्कार गावाला मिळून देऊ असल्याचे सांगितले.
राठोड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहें.