
दै.चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
पणजी :- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद यांच्या उपस्थितीत साखळी येथे ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आज उद्घाटन करण्यात आले. आरोग्य संचालनालय आणि प्रसाद नेत्रालय, उडपी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी नेत्रतपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यांची तपासणी, शस्त्रक्रिया यासाठी लागणारा खर्च बऱ्याचवेळा पेलत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या सामाजिक उपक्रमातून नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी, शस्त्रक्रिया, औषधे, चष्मे मोफत दिले जातात. व्हिजन फॉर ऑलच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरातील जनतेच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
आतापर्यंत या शिबिराच्या माध्यमातून 15340 नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे. 9158 जणांना मोफत चष्मे आणि 1251 नागरिकांची मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी यावेळी दिली.