
*दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी:-माधव गोटमवाड*
कंधार:- कंधार तालुक्यातील रस्त्यांच्या कामांची दोष निवारण कालावधीतील दुरुस्ती व त्या रोडचे करार पत्रकाप्रमाणे दोष निवारण कालावधी अशा प्रकारचे माहिती दर्शविणारा फलक संबंधीत रोडवर लावून जनतेला याची माहिती द्यावी . कंधार तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जाधव व्यंकटी यांनी उप अभियंता कंधार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कोणतेही विकास कामे करताना त्या कामाची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात येते,ठेकेदार थातुर,मातुर कामे करुन निधी हाडप करण्याचे काम करीत असतात . काही ठिकाणी तर दरवर्षी तोच तो रोड करण्याची वेळ येते , कारण असते कामाचा दर्जा.कामे करताना कमी प्रमाणात मटेरियल वापरून थोड्याशाही पावसाने रोड वाहुन जातो किंवा खडे पडणे असे प्रकार घडत असतात यामुळे हा रोड कधी बनविण्यात आला.किती निधी खर्च करण्यात आला त्याच्या दुरुस्तीचा कालावधी यासह सर्वच माहिती दर्शविणारा फलक संबंधीत ठिकाणी लावण्यात यावा अशी मागणी अण्णा हजारे प्रनित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलननाचे कंधार तालुका उपाध्यक्ष जाधव व्यंकटी गोविंद व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कंधारे ,माधवराव वडजे यांनी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कंधार व तहसीलदार कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.