
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावरील गाड्यावर खाद्यपदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये डायआयब्युटाइल फटालेट आणि डायइन आयसोब्युटाईल या केमिकलचा वापर केला जातो, हे केमिकल आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने वर्तमानपत्राचा वापर कमी करण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत.
_*काय आहे नवीन आदेश.?*_
हॉटेलमालकांनी आणि दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
यामुळे त्यांनी पोहे, वडे, भजी, यासारखे अनेक गरद पदार्थ खायला देण्यासाठी किवा बांधून देण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करावा.
● तसेच टीश्यू पेपरमुळे खाद्यपदार्थावरील अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत होईल अशी माहिती फूड, सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथोरिटी ऑफ इंडियाने दिली आहे