
दै. चालु वार्ता
लोहा शहरातील लिंबोनि गल्ली येथील नालीचे बांधकाम होऊन महिना होवुन गेला तरी त्यावर स्लॅप टाकाला नाही गेंड्याची कातडी पांघरलेल्या नगर पालिकेला जाग येत नाही एखादी दुर्घटना झाल्याशिवाय मुख्याधिकारी व शासनाला जाग येत नाही अशी परिस्थिती सध्या लिंबोनि गल्लीतील नालीची झाली आहे
डॉ याकुबखा उर्दू शाळेतील छोटे छोटे विद्यार्थी जीवाची कसरत करीत उघड्या नाली वरून ये-जा करीत आहेत यातच आज सकाळी शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना नाली वरच्या पाटिवरून विद्यार्थ्यांना आणत असताना शाळेतील शिक्षकांचा तोल जाऊन नालीत पडता पडता वाचले
जागे व्हा मुख्याधिकारी साहेब जागे व्हा तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांद्या साठी तरी जागे व्हा स्वतःहून येवुन पहा आणि जागे व्हा
जर कदाचित काही दुर्घटना घडली तर मुख्याधिकारी साहेब तुम्ही या घटनेत स्वतः जबाबदार राहताल अशी जनतेत चर्च्या आहे