दै. चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट: जे एन आय इ एस टी आर ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड -१ तर्फे दूध व्यवसाय व पशुधन व्यवस्थापन क्षमता बांधणी कार्यक्रम अंतर्गत जगत दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रशिक्षणामध्ये कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे डॉक्टर महेश अंभोरे यांनी गाई व म्हशीच्या विविध जाती ,त्यांची निवड या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये डॉ.पुरी पशुधन विकास अधिकारी सोंनखेड यांनी गोठा व्यवस्थापन व दैनंदिन कार्य तर दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन या विषयी डॉ. अश्विनी खरवडकर यांनी मार्गदर्शन केले.दुधाळ जनावरांतील विविध आजार व त्याचे उपचार यावरती परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयातील डॉ. मिरा साखरे सहायक प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर देवीकांत देशमुख यांनी भविष्यात या प्रशिक्षणार्थी मधून प्रशिक्षणार्थी स्वयंरोजगार निर्माण करतील अशीआशा व्यक्त केली.कार्यक्रमाचा शेवट डॉ. देविकांत देशमुख प्रा. कल्याणकर डॉ. गिरीश देशमुख, प्रा. जायभाये या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष , कोषाध्याक्षा व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले सदरील प्रशिक्षणार्थींना भोजनाची व इतर सुविधा पुरविण्यासाठी सतीश कुमार जाधव यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वाडीले सर , राजीव इंगोले, श्री भालेराव , हाडोळतीकर मॅडम , शंकर कोनापुरे, दत्ता कदम, गायकवाड ,संतोष वाघमारे यांचे सहकार्य लाभले.