
दै.चालू वार्ता
प्रतिनिधि नांदेड दक्षिण
बालाजी पाटील गायकवाड
गेल्या अनेक वर्षापासून आंबे सांगवी या नगरीमध्ये श्री संत सोपान काका समाधी सोहळ्यानिमित्त पारायण हरिपाठ काकडा भजन व कीर्तनाचे आयोजन केले जाते श्री ह भ प रुद्रप्पा महाराज अंबेसांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यंकट महाराज पांचाळ यांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण होत असते याहीवर्षी आंबेसांगवी दररोज पहाटे तीन ते चार या वेळेमध्ये काकडा भजन दासराव पाटील कदम, शिवाजी उमरेकर, बापूराव जाधव , हे घेत असतात दिनांक 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत गावांमध्ये 21 ज्ञानेश्वरीचे पारायण पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये आयोजित केलेआहे या पारायणासाठी पुंडलिक पाटील कदम, गंगाधर पाटील कदम, मारोती कदम पाटील सावंत ,योगेश कदम ,पांडुरंग कवठेकर, गायत्री उमरेकर, अर्जुन उमरेकर ,सुभाष जाधव ,माधव सावंत ज्ञानेश्वर गणगोपले, प्रसाद उमरेकर, विठ्ठल उमरेकर , शिवराज कदम , अरुण कदम, शामराव राम पाटील सावंत ,मंडळी ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ वाचण्यासाठी पारायणासाठी दररोज पहाटे उपस्थित असतात ज्ञानेश्वरी वाचनामुळे ज्ञान तर वाढतेच पण व्यवहारिक गोष्टीची जीवन जगत असताना माहिती होते असा हा पवित्र ग्रंथ आणि त्या ग्रंथाचे पारायण मोठ्या उत्साहात मध्ये आंबेसांगवी मध्ये होते व सोपान काका सोहळा समाधी च्या दिवशी या पारायणाची सांगता सर्व गावकरी मंडळी मोठ्या उत्साहाने करत असतात.