
दै. चालु वार्ता
*प्रतिनिधी अरुण भोई*
दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लाईट व म्हाडा व आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या विषय चर्चा केली.हिवाळी अधिवेशन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा गोंधळ, म्हाडा व आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचे प्रकरण, भरतीतील गैरव्यवहार यामुळे शासकीय भरतीसाठी तयारी करणारे राज्यातील लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत, यापूर्वी दौंड तालुक्यातील स्व. स्वप्नील लोणकर व स्व. मल्हारी नामदेव बारवकर हे विद्यार्थी शासकीय दुराव्यास्था व संबंधित यंत्रणेच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरले आहेत या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
हिवाळी अधिवेशन – कोरोना महामारीचे संकट, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला राज्य शासनाने वीज बिलामध्ये सवलत द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व विविध सवलतींच्या आश्वासनांची पूर्तता व्हावी व थकीत वीजबिलापोटी खंडित केलेले शेती पंपाचे वीज जोड पूर्ववत करावेत अशी मागणी आज सभागृहामध्ये केली.