
दै. चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
कोरपना तालुका – प्रतिनिधी
कोरपना तालुक्यातील गट ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येते असलेल्या मौजा इरई येथील मुख्य म्हणजे इरई ते कवठाळा रस्त्यात अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडून गिट्टी बाहेर निघाली असून सदर रस्ताची दुरुस्ती करण्यात यावं अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे याच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांनी जिल्हा परिषद, चंद्रपूर च्या अध्यक्षा मा.सौ.संध्याताई गुरुनुले यांच्याकडे सदर प्रकरणाबाबत निवेदन देऊन दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठी घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकाचे अपघात होत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाला सांगून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती /नूतनीकरण करण्याची मागणी युवा स्वभिमान पक्षा तर्फे करण्यात आली. विशेष म्हणजेच गावातील रुग्ण व गर्भवती स्रियांना दवाखान्यात घेऊन जाण्यास खुप मोठा त्रास गावकऱ्यांना होत असल्याची माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पिदूरकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा यांना दिली. असता त्याच्या काढून तात्काळ सदर रस्त्याचे नूतनीकरण तसा दुरुस्तीकरिता नक्कीच पाऊल उचलले जाईल असे सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली.