
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधि
महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय रुई येथे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या जीवन चरित्रा वर आधारित पोस्टकार्डा वर निबंध लेखनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डा वर नेत्यान्च्या जीवन चरितरावर आधारित निबंध लेखन करून पोस्ट कार्ड भारताचे माननीय प्रधानमंत्री यांना पाठवण्यात आले. यासाठी डाक घर रुई इथून पोस्ट कार्ड उपलबध झाले असून, पोस्टकार्ड लिहून घेण्याचे कार्य शाळेचे सहशिक्षक श्री पवार एन एम यांनी केले. तर शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एस पाटील व सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.