
दै. चालु वार्ता
मंठा पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची कारवाई
मंठा– दि24 मंठा पोलीस ठाणे यांची कारवाई अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक सह तीन क्विंटल 7 किलो 200 ग्रॅम गांजा रुपये 18 लाख 43 हजार सहाशे ऐंशी रुपयाचा जप्त केला. यामध्ये ट्रक क्रमांक एम एच 21 बी. एच.1758 ज्याची किंमत वीस लाख रुपये व नर्सरीची 800 झाडे रुपये सहा लाख किमतीची एकूण 44 लाख 43 हजार 680 रुपयाचा माल जप्त केला आहे.व दोन जण ताब्यात घेतले. आज रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान पोलीस ठाणे येथे गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मंठा पाटी येथील हॉटेल इंडियन समोर एक संशयित ट्रक क्रमांक एम एच 21 बी.एच. 1758 हा उभा होता सदर ट्रक च्या मागील बाजूस नर्सरी मधील झाडे होती सदर झाडाच्या पाठीमागील बाजूस पांढ-या रंगाच्या 12 गोण्या यामध्ये एकूण 148 पॅकिंग केलेले गांजाची पुढे 18 लाख 43 हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मालक व 800 विविध प्रकारच्या झाडांची रोपे किंमत सहा लाख रुपयाची व सदर माल या ट्रकमध्ये लपवून ठेवला होता त्याचा क्रमांक एम एच 21 बी. एच.1758 याची किंमत वीस लाख रुपये असा एकूण 44 लाख 43 हजार सहाशे ऐंशी रुपये जप्त केला असून सदर ट्रक मधील इसम नामे गोविंद हिरालाल चांदा वय 42 वर्षे व बांदल हिरालाल चांदा वय 35 वर्षे दोन्ही रा कल्याणी तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना ताब्यात घेण्यात आले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री विनायक देशमुख मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत देशमुख माननीय पोलीस अधिकारी श्री राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस कॉन्स्टेबल दिपक ढवळे सुभाष राठोड,संजय चव्हाण, श्याम गायके,राजू राठोड,सविता फुलमाळी, दीपक आढे, प्रशांत काळे,विजय सुळे,मांगीलाल राठोड,संदीप राठोड, आकाश राऊत,घोडके विशाल, खेडकर, वाघ, संतोष बनकर, बर्गे, मार्कड, खलसे, जाधव तसेच आदी होते.